Untitled
शिंग फुंकिले रणी, वाजतात चौघडे
सज्ज व्हा, उठा उठा, सैन्य चालले पुढे
दास्यकाल संपला, शांत काय झोपला ?
अग्नि येथ कोपला, पेटुनी नभा भिडे
लोकमान्य केसरी, गर्जतात वैखरी
माजला असे अरी, चारु त्याजला खडे
वीस सालचा लढा, जाहला किती बडा
इंग्रजास बेरडा, आणिले कसे रडे
तीस सालची प्रभा, उज्ज्वला भरी नभा
गांधि अग्रणी उभा, ठाकला रणी पुढे
शीर घेउनी करी, दंग होउ संगरी
घालवू चला अरी, सागरापलीकडे
Reviews
No reviews yet.